महाराष्ट्र

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भीम मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

बदलत्या जीवनशैलीमुळे व्यायाम करणे काळाची गरज - राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन

सिल्लोड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सिल्लोड येथे शुक्रवार ( दि.8 ) रोजी सायंकाळी राजरत्न प्रतिष्ठानच्या वतीने भव्य भीम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते हिरवा झेंडा दर्शवून या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. सामाजिक समता आणि समानतेचा संदेश या मॅरेथॉन स्पर्धेतून देण्यात आला.

या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. शहरातील भोकरदन चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलींमध्ये सिल्लोड शहरातील प्रतिक्षा काशिनाथ कायटे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर वैष्णवी नंदादेव श्रीखंडे हिने द्वितीय, रविना प्रल्हाद लोखंडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांमध्ये सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील साईनाथ एकनाथ मोरे याने प्रथम क्रमांक पटकावला तर तालुक्यातील वसई येथील मंगेश ज्ञानेश्वर गुळवे याने द्वितीय , सिल्लोड येथील विशाल केशव दांडगे याने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वीरीत्या मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहेत. आपले सर्वांचे आरोग्य सदृढ असणे किती महत्वाचे आहे हे कोरोना संकटात सगळ्यांनी अनुभवले. प्रत्येकासाठी व्यायाम काळाची गरज असून चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान 30 ते 40 मिनिटे चालणे किंवा धावणे गरजेचे असल्याचे मत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी मार्गदर्शन करीत असतांना व्यक्त केले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगराध्यक्षा तथा राजरत्न प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राजश्रीताई निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, शिवसेना विधानसभा संघटक सुदर्शन अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, पं. स.सदस्य निजाम पठाण, डॉ. राधकीसन झलवार, नगरसेवक शंकरराव खांडवे, रउफ बागवान, विठ्ठल सपकाळ, जितू आरके, मतीन देशमुख, शेख सलीम हुसेन, बबलू पठाण, राजू गौर, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, नगरसेविका शंकूतलाबाई बन्सोड, कल्याणी गौर, डॉ. कुंती झलवार, वर्षा पारखे, अकिल देशमुख, डॉ. दत्ता भवर, दीपक अग्रवाल, फहिम पठाण, राजेश्वर आरके आदींसह स्पर्धक व शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे