राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने “प्राधान्य लाभार्थी कुटुंब” योजना अंतर्गत दिली ऑर्डर
चोपडा (विश्वास वाडे) राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने तसेच माजी विधानसभाअध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या उपस्थितीत “प्राधान्य लाभार्थी कुटुंब” योजना अंतर्गत ऑर्डर देण्यात आले.
या ठिकाणी अरुणभाई गुजराथी साहेब म्हणाले की, भरपूर दिवसापासून प्राधान्य लाभार्थी कुटुंब योजनेपासून बरेच से बांधव वंचित होते. याचा योग्य तो पाठपुरावा करत समाधान माळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष यांनी केले. त्यामुळे आज आपल्या सर्वांना या गोष्टीचा लाभ होत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने सुशिस्तीत जगले पाहिजे वंचित अभावग्रस्त कोणीही राहू नये ही त्यामागची भावना आहे. सामाजिक न्यायाची भावना, मानव कल्याणाची भावना यामागे आहे व्यक्ती सहाय्य कार्याचा मूल्यांना मानवी संस्कृती चा व माणूस सभ्यतेचा संकल्पनेचा आधार आहे भरपूर दिवसापासून प्राधान्य लाभार्थी कुटुंब या योजनेपासून वंचित होते. आज त्यांना प्राधान्य लाभार्थी कुटुंब या योजनेअंतर्गत ऑर्डर देण्यात आले. आपण एक समाजाचे घटक आहोत या माध्यमातून प्रत्येक वंचित असलेल्या कुटुंबापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे जेणेकरून त्या कुटुंबांना या योजनेचा पुरेपूर उपयोग होईल असंच सहकार्य आपण सर्वांनी देखील केले पाहिजे.
याप्रसंगी उपस्थित पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन चंद्रासभाई गुजराथी, रा.यु.काँ शहराध्यक्ष श्यामसिंग परदेशी, रा.यु.काँ जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल स्वामी, युवक शहर कार्याध्यक्ष प्रफुल पाटील, योगेश महाजन, विजय नरेंद्र माळी, रोहित माळी, सर्व युवक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थिति होते. रा.यु.काँ युवक शहराध्यक्ष समाधान माळी यांनी शेवटी आभार व्यक्त केले.