महाराष्ट्र
माविआ सरकारच्या विरोधात आ. प्रभूदास भिलावेकर यांच्या नेतृत्वात जन आक्रोश आंदोलन
धारणी (पंकज मालवीय) भाजप धारणी तालुका (मेळघाट) महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मेळघाट क्षेत्राचे कर्तव्यदक्ष, माजी आमदार प्रभूदास भिलावेकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालय धारणी येथे मेळघाटातील विविध समस्या घेऊन जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
आंदोलना मध्ये भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल मावस्कर, माजी उपआयुक्त रामेश मावस्कर, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा महामंत्री साबूलाल दहिकर, भाजपा माजी तालुकाध्यक्ष सदाशिवराव खडके, सुभाष गुप्ता, श्याम गंगराडे, नगरसेविका क्षमा चौकसे ,नगरसेविका संगीता खारवे, सुधाकर फकडे, सोमकली दारसिमबे, रामदास नालमवार, धोंडू मुंडे, पं.स.सदस्य रामविलास दहिकर, भाजयुमो जिल्हा सचिव सुमित चावरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंबर बनसोड, अनुज पांडे, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.