अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी डॉ. दिलीप लोखंडे निमंत्रित कवी कट्टा या काव्यमैफिलीत कविता सादरीकरनाची संधी
शिंदखेडा : उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल दरम्यान होऊ घातलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिंदखेडा तालुक्यातील कवी डॉ. दिलीप महिपती लोखंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
मूळचे साक्री (ता. साक्री) येथील कवी दिलीप लोखंडे यांना साहित्य संमेलनात कवी कट्टा या काव्य मैफलीत होणाऱ्या मराठी कविता सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
संमेलन साधारण ३दिवस होणार आहे. २२ ते २४ एप्रिल दरम्यान मराठवाड्यातील उदगीर येथे संमेलन होणार आहे. दिलीप लोखंडे हे उत्तम व्याख्याते,विचारवंत,असून मराठी भाषेतून कवीता लेखन करतात.ते साक्री तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत.
उत्तम लेखक, कवी व्याख्याते म्हणून ते परिचित आहेत. तसेच शिंदखेडा पंचायत समिती येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, आपल्यातील प्रतिभावंत सहकारी अधिकाऱ्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सादरीकरणाची संधी मिळणार असल्याने यामुळे त्यांचे शिंदखेडा गटविकास अधिकारी देवरे ,डॉ. देसले आदी मित्र परिवार आणि सहकाऱ्यांनी कौतुक केले.