जि. प.शाळेमध्ये पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे वाटप
देगलुर (मारोती हणेगावे) तालुक्यातील चैनपुर येथे महिला बचत गट शाखा देगलूर च्या वतीने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पर्यावरण पूर्वक कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
तालुका महिला बचत गट सदस्य व भीमाशंकर बचत गटाच्या अध्यक्षा सविता मारोतीराव हनेगावे यांच्या पुढाकारातून तालुक्यातील अनेक गावांमध्ये व चैनपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप बचत गट अध्यक्ष सविता हनेगावे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष सरपंच अनुपमा वाघमारे, ग्रा.प. सदस्य जयश्री गवलवाड, ग्रा.प. सदस्य हानमाबाई मदनुरे व तसेच रमाई महिला बचत गट, रामलिंग महिला बचत गट, तसेच तंटामुक्त समिती, शालेय व्यवस्थापन समिती, व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख केशव, मुख्याध्यापक पाटील व सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना बचत महिला बचत गट अध्यक्षांनी गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन गावातील विकासात हातभार लावावे असे आव्हान केले.