वारूड गावाची लोडशेडिंग तात्काळ रद्द करावे ; उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील वारुड येथील गावातील वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उपकार्यकारी अभियंता गणेश अस्मार यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

त्याप्रसंगी हिरालाल बोरसे माजी उप तालुकाप्रमुख, वाहतूक सेना अध्यक्ष अशोक पाटील, बाल राजे पवार, महेंद्र राठोड , दीपक बोरसे, शाखाप्रमुख सुरेश सिसोदे, महेश चौधरी, जितेश भदाणे ,आसिफ पटेल शिवसैनिकांनी उपस्थित होते.

उपकार्यकारी अभियंता सांगितले की, वारूड गावातील वसुली शंभर टक्के झाली थकबाकी नाही तसेच वीज चोरी देखील गावात नाहीय असे असताना आपल्या कार्यालयामार्फत वारुड गावाची लोडशेडिंग करण्यात आली योग्य नाही असे आम्ही सांगितले.

त्यावर त्यांनी सांगितले की सोमवार पर्यंत वारुड लोडशेडिंग मुक्त करू असे आश्वासन दिले जर झाले नाही तर शिवसेना स्टाईलने येत्या आठ दहा दिवसात उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला.





