हरिपूरा धरणात होत असलेला भ्रष्टाचार पोसला जाईल की नष्ट केला जाईल? ; परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा
जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील सातपुडा च्या पायथ्याशी असलेले हरिपूरा ह्या गावा लगत धरणाचे काम गतीने सुरू असून तेवढ्याच गतीने धरणाचे बांधकामत भ्रष्टाचार होत असल्याचे परिसरात बोलले जात आहे. दगड झालेले कालबाह्य सिमेंटचे पुन्हा पावडर करून बांधकामात वापर करत असल्याचे ह्या ठिकाणी नागरिकांना आढळून आले.
ह्या संदर्भात काही जागृत नागरिकांनी बांधकामावर उपस्थित इंजिनीयर, सुपरवाईजर ह्यांना ह्या समंधी विचारले असता उडवा उडवीचे उत्तरे नागरिकांना त्यांच्याकडून मिळालीत, तर काही नागरिकांना असे प्रश्न उपस्थित केल्यास शासकीय कामात अडथळा आणल्याचे सांगू व आपल्यावर गुन्हा दाखल करू तर प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना संबंधित ठेकेदाराचे लोक ही आमच्या कामावरील माणसांना मारहाण केली, अशा पद्धतीने आपल्यावर गुन्हा दाखल करू अशा पद्धतीने धमकवत आहे. जर हे काम अशाच पद्धतीने सुरू राहीले तर निकृष्ठ पद्धतीचे बांधकाम असलेल्या धरणाची ह्या ठिकाणी निर्मिती होईल व भविष्यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता ह्या ठिकाणी नाकारता येत नाही. तरी बांधकाम थांबऊन सदर कामाची वरीष्ठ पातळीवरुन सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कार्यवाही होऊन गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेल्या धरणाची निर्मिती येथे व्हावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे. जर हे बांधकाम अशाच पद्धतीने सुरू राहीले तर हे धरण परीसरातील लोकांसाठी वरदान ठरण्याऐवजी शाप ठरेल. धरणात होत असलेला भ्रष्टाचार पोसला जाईल की नष्ट केला जाईल हा प्रश्न परिसरातील नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.