महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पिपळगाव बु येथे बौद्ध बांधवानी स्व.खर्चातून केले गतीरोधक दर्शवणारे पेटचे काम
भुसावळ : तालुक्यातील पिपळगांव बु ॥ येथे सार्वजानिक बाधकाम विभाग भुसावळ याच्या कार्यक्षेत्रात येत असता बाधकाम विभातुन प्रगतीपभावर तळवेल पिपळगाव या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले.
दरम्यान, गावाचा जवळ पास गतीरोधक बनवले असता त्या ठिकाणी मोटर सायकल वाहन चालकांना पुढे गतीरोधक असल्याचे दिसून येत नाही. त्या ठिकाणी अनेक वेळा वाहन आदळण्याची दाट शक्यता नाकारता येणाऱ्य नाही. त्याचे निरिक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रहिवाशी भागांतील तरुणांच्या लक्षात येताच १४ एप्रिल या दिवशी जनहितार्थ उपक्रम राबवण्यात आला. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच बौद्ध बांधवानी त्या ठिकाणी श्रमदान केले.