खरवड येथे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
बोरद (योगेश गोसावी) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त तळोदा तालुक्यातील खरवड येथे ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भीमराव जावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य थोडक्यात सांगितले.त्यानंतर ज्येष्ठ नागरिक पंडित जाधव यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. पत्रकार योगेश गोसावी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचावे यासाठी वाचन महत्वाचे असून विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे. असे त्यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सांगितले.
यावेळी यशवंत जावरे, दीपक जाधव, माजी प. स उपसभापती नंदुगिर गोसावी, योगेश शिरसाठ, ज्येष्ठ नागरिक पंडित जाधव, प्रकाश शिरसाठ, भीमराव जावंरे, लोटण जावरे, लखन साळवे, शालेय समितीचे अध्यक्ष भायजी जावरे, भुरा जावरे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.