डोणगाव गोदावरी पूर घोटाळा प्रकरण चिघळले !
वैजापूर : डोणगाव गोदावरी पूर घोटाळा प्रकरण चिघळले. पुरावे असतानाही न्याय मिळत नाही म्हणून प्रकाश डोखे अमरण उपोषण किंवा वेळ आल्यास गावातील पाणी टाकीत जलसमाधी घेणार आहेत.
जलसमाधी घेणार म्हणून पाण्याच्या टाकीच्या शिड्या काढून घेण्यात आल्या व डोखे हे एक आजारी पेशंट असताना वैजापुर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची येथे सोय केली नाही. तरी डोखे यांच्याकडे सदरील पुरावे असतानाही शासन कुठल्याही प्रकारचे दखल घेत नाही म्हणून गावातील नागरिकांनी डोखे यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहे असे ठामपणे सांगितले व तुमचे सर्व खरे असून आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे असे स्पष्ट केले. गावकरी संदीप कसबे, अविनाश सोनवणे, अण्णासाहेब सोनवणे, राजेंद्र सोनवणे, विशाल सोनवणे, अरुण डोखे, आकाश कसबे, अरुण सोनवणे, एडवोकेट अशोक सोनवणे, रामकृष्ण सोनवणे यांनी डोखे अमोल सोनवणे यांना पाठिंबा दिला.
डोणगाव दिनांक 4 ते 7 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये रुपये 14 लाख 63 हजार 745 रकमेचा शासनाच्या तिजोरीतून बेहिशोबी वाटप केल्याबद्दल डोणगाव गोरख शिवनाथ डोखे गट नंबर 166 उतार याप्रमाणे 0.57 आर क्षेत्र असताना 0.80 दाखवले. 0.40 शेती नुकसान 0.40 आर मका दाखवण्यात आली. गट नंबर 49 एकनाथ नाना अल्पशिक्षित असताना इंग्रजीत बनावट सही केली. गट नंबर 17 पंचनामा करत असताना पंच नंबर चार निरीक्षक असताना इंग्रजी बनावट सही केली. पंच नंबर पाच 2014 ला मयत असताना 16-8 2019 रोजी त्याची इंग्रजीत सही केली. गट नंबर 115 116, 126 नदीपासून अंदाजे आठ किलोमीटर असताना पूररेषेत नसताना पंचनामा करून मदत देण्याचा प्रयत्न केला तसेच खातेदारांनी मदत लुटण्याचा प्रयत्न केला. ठरावीक पंचांनी वारंवार सह्या घेऊन खोटे कागदपत्रे तयार केली ते खरे दाखवून गोदावरी नदीचा पूरग्रस्त निधी हडप केला. फसवणूक केली. त्यांच्यावरती 420467468471120 प्रमाणे गुन्हा केला असे असताना चौकशी अधिकारी तत्कालीन नायब तहसीलदार दिपाली खेडेकर व तहसीलदार राहुल गायकवाड यांनी आरोपीला गुन्ह्यातून वाचवण्यास मदत केली. याबाबत वेळोवेळी सरकारी दप्तरी तक्रारी नोंद असताना दखल घेतील जात नाही.