भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
सिल्लोड : भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षांनंतर शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची या मिरवणुकीत प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील भगवान महावीर स्तंभास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. तसेच उपस्थितांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल बोरा यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत सत्कार केला.
यावेळी माजी आ. सांडू पा. लोखंडे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे ,शिवसेना विधानसभा संघटक सुदर्शन अग्रवाल, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, विनोद मंडलेचा , नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, मनोज झंवर, राजू गौर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल , कुणाल सहारे, यांच्यासह सुभाषसेट जैन, धरमचंद मंडलेचा, भिकचंद कर्णावट, राजुसेट खिवंसरा, अनिल गोलेच्छा, गिरीश शाह, रमेश कासलीवाल, सुशील ओस्तवाल, दिनेश ओस्तवाल, प्रसन्न ललवाणी, सुनील पगारिया, दीपक अग्रवाल, सुशील जैन, डॉ. चोरडिया, डॉ. जैन, सुशील गोसावी, संदीप पाटणी, प्रितेश ओस्तवाल, शीतल गोसावी आदींसह सर्कल जैन समाज बांधव व शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.