राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरचा अक्षय इळके प्रथम
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात दि.०३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कै.ना. अक्कासो शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) राज्यस्तरीय वरिष्ठ आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन अनिल गावित (दंडाधिकारी तथा तहसीलदार, चोपडा) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच सावित्रीबाई फुले व कै.ना. अक्कासो. शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष ताईसाहेब आशाताई विजय पाटील उपस्थित होत्या.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आनंद पाटील (बालरोगतज्ज्ञ, मालती हॉस्पिटल,चोपडा), संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब ऍड. संदीप सुरेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी तसेच परीक्षक डॉ. किशोर पाठक व डॉ. रमेश माने आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गौरी चौधरी व समूह यांनी गायलेल्या सुरेल स्वागत गीताने करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे यांनी केले. याप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना तहसीलदार अनिल गावित यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमांचा चांगल्या अध्ययनासाठी व शिक्षणासाठी वापर करून घ्यावा. आजच्या आधुनिक प्रगतीमुळे प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांनी आर्टीफिशियल इंटिलिजेन्स चा वापर आपल्या अध्ययनात करून घ्यावा. यावेळी त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व, नवीन शैक्षणिक धोरण त्याचप्रमाणे कोविडच्या काळातील शैक्षणिक परिस्थिती यांच्यावर भाष्य केले. संस्थेने कोविडच्या काळात महाविद्यालयाने रुग्णांसाठी इमारत उपलब्ध करून दिली तसेच विद्यार्थ्यांसाठी उत्तम विषयांवर स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल संस्थेचे व महाविद्यालयाचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजनामागची पार्श्वभूमी व महत्व विशद केले.
या स्पर्धेत सुनील बारेला (एम. जे. कॉलेज, जळगाव), अहिरे महेश (कला, शास्त्र व वाणिज्य महा. यावल), माधुरी पाटील (एस. एस. एम. एस. महा. पाचोरा), हरिओम पाटील(कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि, जळगाव),शिंपी हर्षल (कला, शास्त्र व वाणिज्य महा. चोपडा), सोनवणे कुणाल (एस. एम. टी. एस. एस. पाटील फार्मसी महा. चोपडा), भोम्बे वैभव (कला, शास्त्र व वाणिज्य महा. बोदवड), बारेला राकेश (पंकज महा. चोपडा),भुसारे शुभम (एस. एस. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महा. जळगाव), ठाकूर सुयश (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महा. धुळे), शिंदे संतोष (किस्टोन स्कुल ऑफ इंजिनिअररिंग कॉलेज, पुणे), पाटील यश(बी. के. बिर्ला, मुंबई), श्रुती बोरस्ते (एच. पी. टी. कॉलेज नाशिक) आणि अक्षय इळके (नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स ,इचलकरंजी, कोल्हापूर) असे महाराष्ट्रातून १४ महाविद्यालयांमधील स्पर्धक सहभागी झाले होते.
त्यात अक्षय इळके प्रथम, यश पाटील द्वितीय, संतोष शिंदे तृतीय, सुयश ठाकूर उत्तेजनार्थ आणि वैयक्तिक उत्तेजनार्थ श्रुती बोरस्ते हे बक्षिसांचे मानकरी ठरले असून त्यांना अनुक्रमे ५०००/-,३०००/-,२०००-/,१०००/- व ५००/-रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. किशोर रघुनाथ पाठक, चोपडा व डॉ. रमेश नामदेव माने, अमळनेर यांनी जबाबदारी पार पाडून विद्यार्थी स्पर्धकांना मार्गदर्शनही केले. बक्षीस वितरणापूर्वी वैभव भोम्बे, सुयश ठाकूर, माधुरी पाटील, महेश अहिरे व अक्षय इळके या स्पर्धकांनी तसेच परीक्षक डॉ. किशोर पाठक यांनी प्रातिनिधिक मनोगतातून स्पर्धेच्या आयोजनाविषयी व स्पर्धकांच्या वक्तृत्व शैलीविषयी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, एम. टी. शिंदे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी बंधू भगिनी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वक्तृत्व मंडळ सदस्य डी.डी.कर्दपवार, एम. बी. पाटील, व्ही. बी. पाटील, किशोर खंडाळे, जी. बी. बडगुजर, बी. एच. देवरे यांच्यासह राजू निकम, माहेश्वरी धनगर, प्रेरणा बडगुजर, नेहा धनगर, मोहिनी पाटील, कविता बोरसे, संजीवनी पाटील, मयुरी पाटील, जयेश सुनील महाजन, विशाल गोपीचंद सपकाळे, गौरी दिपक चौधरी, ऋतुजा हंसराज सोनवणे, निलेश संजय कुंभार यांनी परिश्रम घेतलेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. आर. पाटील यांनी केले तर आभार वक्तृत्व मंडळ प्रमुख डॉ. एम. एल. भुसारे व जी. बी. बडगुजर यांनी मानले.