सांस्कृतिक भीम जयंती मुक्ताईनगरमध्ये साजरी
मुक्ताईनगर (सचिन झनके) भीम जयंतीचे अध्यक्ष सुधाकर बोदडे ,बापू ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली अंतर्गत मुक्ताईनगर प्रवर्तन चौक सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बुद्ध वंदना, धम्म वंदना, बुद्ध गाथा, भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने प्रवर्तन चौकात घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. व तसेच योगायोगाने मुक्ताईनगर परिसरांमध्ये महावीर जयंती सुद्धा होती.
त्यासाठी प्रवर्तन चौक या ठिकाणी महावीर जयंती ची रॅली येत असता जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर बोदडे, बापू ससाणे व समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, रवींद्र बोदडे अनिल बोदडे, उमेश झाल्टे, विशाल बोदडे, विश्वनाथ गणेश, शरद मधुकर बोदडे, रमेश गणेश, यांनी महावीरांच्या प्रथमेश पुष्पवर्षाव करून त्यांना मानवंदना दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नियोजनबद्ध दरवर्षाप्रमाणे मोटरसायकल राहिली प्रदीर्घ काळानंतर काढण्यात आली. या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून भीम जयंतीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले.
सर्व समाजातील स्त्री पुरुष लहान मुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध कार्याची व्हिडिओ फिल्म दाखवून प्रबोधनाचा कार्यक्रम प्रवर्तन चौक या ठिकाणी करण्यात आला. अपक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी देखील कार्यक्रमाला सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतीराव फुले, शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रात्रीच्या सुमारास जयंतीला उपस्थिती देऊन बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून सामाजिक प्रबोधनात्मक संदेश सर्व समाजातील लोकांना दिला.
चाळीस वर्षांमध्ये माझ्या दृष्टिक्षेप नुसार सालाबादाप्रमाणे भीम जयंती अतिशय उत्साहाने आनंदाने सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन या ठिकाणी भीम जयंती साजरी करतात हा मुक्ताईनगरचा एक विशिष्ट जयंती म्हणून महाराष्ट्रात गेली पाहिजे असे पत्रकारांशी बोलत असताना एकनाथ खडसे व्यक्त झाले. या जयंत अध्यक्ष यांच्या वतीने सर्व समाजाच्या लोकांना रात्री दहा वाजेपर्यंत सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमाची चित्रफिती दाखवून प्रबोधन करण्यात आले. जयंती मध्ये सर्व समाजातील लोकांचा प्रत्यक्ष हजर राहिले मुस्लिम बांधव यांनीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करून या जयंतीला हजर राहिले. साईनगर मध्ये अतिशय शांततेने व सुबक पद्धतीने भीम जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. जयंतीच्या कार्यात कर्त्यांना दे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर बोदडे, बापू ससाणे, रवींद्र बोदडे अनिल बोदडे ,उमेश झाल्टे, विशाल बोदडे, विश्वनाथ गणेश, शरद मधुकर बोदडे, रमेश गणेश, राहुल गणेश, विशाल, नंदू जाधव, रमेश बोदडे कार्यक्रम पार पाडण्यात आला. अध्यक्ष च्या वतीने शेवटी कार्यक्रमाच्या सारनात्या घेऊन जयंती संपन्न झाली.