बाळराजे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्धाटन
सोलापूर : कुरुल (ता.मोहोळ) येथे लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य बाळराजे राजन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने साई सुमन मंगल कार्यालय कुरुल येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्धाटन आ. राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार यशवंत (तात्या)माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
महाआरोग्य शिबिराचा कुरुल परिसरातील गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार यशवंत(तात्या)माने यांनी केले. तसेच आरोग्य शिबिरात आमदार यांनी आरोग्य तपासणी देखील करून घेतली. यावेळी लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, डॉ. विनिता पाटील-गोरे, डॉ. विशाखा पाटील-फाळके, डॉ. संदेश कादे, डॉ.संदिप कादे, डॉ.अमजद सय्यद आदी मान्यवरांसह इतर विषय तज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, नागरिक व मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.