गुन्हेगारीजळगाव जिल्हा

जुने भांडण उकरून काढत तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण !

जळगाव (अखिलेशकुमार धिमान) जळगाव येथील खंडेराव नगरात जुने भांडण उकरून काढत तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी दोन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हर्षल गोपाल बारी २३ वर्षीय तरुण खंडेराव नगरातील राहतो. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता त्याला मागील भांडणाच्या कारणावरुन योगेश हरीलाल सोनार व निलेश हरिलाल सोनार या दोघ भावंडांनी चापटासह बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या हर्षलचा मित्र राहूल लक्ष्मण सुतार यालाही दोघा भावंडांनी मारहाण केली.या मारहाणीत हर्षलच्या डोक्यास दुखापत झाली असून तो जखमी झाला आहे.

याप्रकरणी हर्षच्या तक्रारीवरुन योगेश सोनार व निलेश सोनार या दोघा भावंडांविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कालसिंग बारेला हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे