मुक्तळ येथे शंभर वर्ष झाले पूर्ण ; नाट्यपरंपरा व नुर्सिंह अवताराचे सोंग परंपरा कायम सुरू
भुसावळ (प्रमोद बावस्कर) बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती या काळामध्ये श्रीरामाची पालखी प्रदक्षणा व एकादशीला नाटकाचा पहिला खेळ दिनांक १२.४ लां रात्री ९ते११ यावेळेस सलग चार दिवस नाटकं सादर केली जातात आणि शेवटच्या खेळाला हनुमान जयंती च्या सकाळी नरसिंहा उताराचे सॉंग काढले जाते यावर्षी प्रथम नाटक माणुसकीचा खून, दुसरे नाटक सवाल कुंकवाचा, गरीबांचा कैवारी, केल्या कर्माचे फळ, अशी नाटके सादर करून नुर्सिंह अवताराचे सोग मुक्तळ येथील बाळू बुवा हे घेत होते.
त्यांच्या पश्चात आत्माराम पवार हे घेतात. पूर्ण सोगाची सजावट रामेश्वर लोहार हे करतात. पूर्वी मुक्तळ येथील प्रभाकर गोपाळ जोशी, भवरीलाल ताराचंद जैन, शामराव टेलर, तुकाराम टेलर, धनगर राघो, धनगर चिटकुल, तुकाराम टेलर, मनोहर लोहार, राजाराम पाटील, भाऊराव पाटील ही सर्व मंडळी नाटकांमध्ये कामे करीत होती. आता गावातीलच तरुण मुले कामे करतात. प्रत्येक समाजातील प्रत्येक तरुण मंडळी, नागरिक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटी सदस्य, चेअरमन व सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पूर्वीपासूनच प्रयत्न करतात. खंड न पडता फक्त कोरोना काळात बंद होती. यासह या परिसरातील बोदवड तालुक्यातील परंपरा टिकवणारे हे पहिलेच गाव आहे असे वास्तव आहे. आता हल्ली कंपनीचे मॅनेजर ब्रिजलाल भवरलाल जैन, मॅनेजिंग डायरेक्टर रामदास पाटील व सर्व जबाबदारी सुनील पाटील, बंडू पाटील, सुरेश पाटील, रुपेश पाटील यासह गावातील सर्व तरुण मंडळी यात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीरित्या होण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारत असतात.