‘जिओ’च्या रिचार्जवर चक्क ‘स्मार्टफोन’ फ्री..! ‘जिओ’कडून ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर..!

मुंबई : टेलिकाॅम क्षेत्रातील सध्याचे भारतातील आघाडीचे नाव म्हणजे, अर्थातच ‘रिलायन्स जिओ’… टेलिकाॅम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. अशा वेळी इतर कंपन्यांची तुलनेत ‘जिओ’चे प्लॅन ग्राहकांना काहीसे स्वस्तात मिळतात… जिओने (Jio) अनेक स्वस्तात मस्त ‘प्रीपेड प्लॅन’ सादर केले आहेत.
‘जिओ’ने नुकताच धमाकेदार प्लॅन सादर केला आहे.. जो इतर कोणत्याच कंपन्यांकडे मिळणार नाही. जिओ कंपनी आपल्या या प्लॅनमध्ये नेहमीप्रमाणे कमी किंमतीत डेटा, मोफत कॉलिंगसोबतच चक्क ग्राहकांना 4-जी स्मार्टफोन मोफत देत आहे.
वाचून आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरंय..! ‘जिओ’च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ रिचार्जसाठी पैसे द्यावे लागणार आहे. त्यानंतर कंपनीकडून तुम्हाला मोफत स्मार्टफोन मिळणार आहे.. चला तर मग या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊ या…
‘जिओ’चा शानदार प्लॅन..
‘रिलायन्स जिओ’ने नुकताच 1499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केलाय.. या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल दोन वर्षांची वैधता मिळते.. देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाॅईस कॉलिंग सुविधा दिली जाते. संपूर्ण वैधतेसाठी एकूण 24 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. 1499 रुपयांत 1 वर्षासाठी ग्राहक या प्लॅनचा फायदा घेऊ शकता व पुढील 1 वर्षासाठी ग्राहकांना फक्त 749 रुपये खर्च येतो.
टेलिकॉम क्षेत्रातील इतर कोणत्याही कंपनीकडे 2 वर्षांच्या वैधतेसह येणारा प्लॅन नाही. केवळ ‘जिओ’कडेच या वैधतेसह डेटा, कॉलिंगसह येणारा प्लॅन उपलब्ध आहे. शिवाय, या प्लॅनसोबत ग्राहकांना चक्क 4-जी स्मार्टफोनही मिळतो.
मोफत स्मार्टफोनबाबत..
‘जिओ’च्या 1499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसोबत ग्राहकांना ‘जिओ फोन 4G'(Jio phone 4G) मोफत देत आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 2999 रुपये आहे. मात्र, ग्राहकांना हा स्मार्टफोन फ्री मिळेल.
स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबाबत बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 2.4 इंच QVGA डिस्प्ले, 1500 एमएएचची बॅटरी, एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत स्टोअरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी 0.3 मेगापिक्सल फ्रंट व 0.3 मेगापिक्सल रिअर कॅमेरा दिला आहे.
शिवाय या फोनमध्ये व्हाईस असिस्टंन्टचाही सपोर्ट मिळतो. तसेच, इंग्रजीसह 18 भाषांचा सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये सर्व ‘जिओ अॅप्स’चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. एकाच रिचार्जमध्ये डेटा, कॉलिंगसह स्मार्टफोन मोफत मिळत असल्याने ग्राहकांची खऱ्या अर्थाने चांदी आहे..



