शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करा ; सुरज देसले यांची मागणी

शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक अडचणी येत आहेत.वेळोवेळी विविध प्रकारचे निवेदन, तक्रार केली आहेत. मात्र दुर्लक्ष केले जाते. उपजिल्हा रुग्णालय व्हावे ही मागणी शासनाकडे कित्येक वर्षे पासून होत आहे.
आता उन्हाळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत असून तापमान 42 ते 43 अंशावर पोहचले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी सूचना देखील दिल्या आहेत. तापमानाचा पारा 43 अंशावर जाऊन ठेपला आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करून शिंदखेडा शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णांना सोय होईल. म्हणूनच शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करा अशी मागणी नगरसेवक तथा भाजपा विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.