अभाविप स्थापना दिनानिमित्त जामनेर महाविद्यालयात वृक्ष रोपण.
जामनेर:दि.१३ जुलै २०२२ प्रतिनिधि: ईश्वर चौधरी
जामनेर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिन व राष्ट्रीय विध्यार्थी दिनानिमित्त दि.११ जुलै रोजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात,जामनेर येथे वृक्ष रोपण व श्रमदान करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक, सामजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरत पणे काम करत आलेली आहे. विध्यार्थी परीषद विद्यार्थ्यांना संस्कार देऊन चारित्र्य निर्माण करून अभाविपने समाजा मध्ये व्यापक सन्मान आदर आणि पाठबळ प्राप्तकेलेआहे.कोणत्याही संघटनेसाठी ७४ वर्षांचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा असतो.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही केवळ विद्यार्थी संघटना नसून एक वैचारिक क्रांती आहे ज्यामध्ये भारतीय तरुणांनी त्यांच्या शिक्षणासोबतच समाज व राष्ट्राप्रती त्यांची जबाबदारी ओळखण्याचे काम अभाविप ने केलें आहे.
अभाविप च्या ७४व्या स्थापना दिनानिमत्ताने महाविद्यालयात वृक्ष रोपण करण्यात आले या वेळी जामनेर तालुका एज्यूकेशन सोसायटीचे सचिव श्री.जितेंद्र रमेश पाटील,प्राचार्य कुलकर्णी सर,प्रा. किरण पाटील अभाविप जिल्हा संयोजक कल्पेश सोनवणे, शहरमंत्री पवन बावस्कर, चेतन नेमाडे, कुणाल सपकाळ,मोनाली जैन, जागृती गवळी, हर्षाली चौधरी, शुभम पाटिल,यश पर्वते, दीपक गवळी,किरण चव्हाण, रितेश चव्हाण, मयूर वाघ, प्रतीक महाजन,जया पाटिल, निकिता पाटिल, जयश्री सोमास, नेहा मोगरे व महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.