शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे ग्रामपंचायत 18 लाखांहून अधिकचा अपहार ; तत्कालीन तीन ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील कुरुकवाडे ग्रामपंचायतीत शासकीय अपहार केला असून म्हणुन तत्कालीन तीन ग्रामसेवकांविरुद्ध दोंडाईचा पोलिस स्टेशन ला फिर्याद दाखल केली असून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष किसन सावकारे ( रा.दोंडायचा ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे ग्रामपंचायतीत दि.4 एप्रिल 2015 ते दि. 30 जुन 2017 या कालावधीत 13 व 14 या वित्त आयोगाच्या शासनाकडून प्राप्त झालेली रक्कम गावातील विकास कामांसाठी न वापरता स्वतच्या फायद्यासाठी वापरुन शासनाची फसवणूक केली असून शासकीय रकमेचा अपहार करण्यात आला. एकुण 18 लाख 98 हजार 930 रुपयांची ही रक्कम असुन त्यासाठी तत्कालीन तीन ग्रामसेवकांना दोषी ठरविण्यात आले आहे.
त्यात तत्कालीन ग्रामसेवक व शिरपूर पंचायत समितीतील संजय आश्रु कंकाळ (वय 45 रा.वडेल रोड पोलिस काॅलनी, देवपुर धुळे) तत्कालीन ग्रामसेवक व शिरपूर पंचायत समितीतील मंगुलाल शंकर मराठे.(वय 44 रा.करवंद नाका, शिरपूर) , ग्रामसेविका श्रीमती मिनाबाई दुल्लभ सोनवणे (वय 43 रा.कुरुकवाडे ) या तिघांचा समावेश आहे.दुपारी दोंडाईचा पोलिस स्टेशन ला तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भादवि कलम 420, 405, 409 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोसई सचिन गायकवाड यांच्या कडे पाठवले आहे. ह्याबाबत कुरुकवाडे येथील माजी पंचायत समितीचे सभापती शामकांत पाटील सह सामाजिक कार्यकर्ते यांनी बराच पाठपुरावा करून पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला देखील बसले होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे असे म्हणावे लागेल.