नालंदा हॉटेल समोर मुंबई-आग्रा महामार्गावर गॅस टँकर उलटला
धुळे (विक्की आहिरे) मुंबई आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक 3 नालंदा हॉटेल समोर गॅस टँकर उलटल्याने 2जण किरकोळ जखमी शहरातील मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक तीन नालंदा हॉटेल समोर गॅस टँकर चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने 11 एप्रिल सोमवारी सायंकाळी उलटला.
यात चालक संचालक दोघे जण किरकोळ जखमी झाले गॅस टॅकर दहेज गावाकडून नागपूरकडे जात असताना हा अपघात झाला. प्रोपेन गॅस टँकर क्रमांक एम एच 12 पी क्यू 0330 मध्ये गॅस पूर्णपणे भरलेला होता. नालंदा हॉटेल समोर नॅशनल हायवे वर टॅकर पलटी झाला.
महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गॅस गळती सुरू झाली होती. ती प्रत्यक्ष स्थितीतून दिसून येते आहे. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक खबरदारी दृष्टीने अन्य मार्गाने वळवली होती. महानगरपालिका अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच महापालिकेचा अग्निशामक दलाच्या पाण्याचा एक बंब तातडीने काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाला. लडींग फायरमन अतुल पाटील फायरमन श्याम कानडे पांडुरंग पाटील नरेंद्र बागुल यांनी लीक होणाऱ्या गॅस टॅकर वर आग लागू नये मोठी हानी होऊ नये यासाठी पाण्याचा मारा सूरु केला.
लिकेज बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांची संपर्क साधण्यात आलेला आहे काहीकालावधीतच ते घटनास्थळी दाखल होऊन लिकेज बंद केले जाईल अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी तुषार डाके यांनी दिली आहे. यात सुदैवाने कुठलीही मोठी हानी झालेली नाही. घटनास्थळी आजाद नगर पोलीस कर्मचारी महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचारी खबरदारीच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रण करत आहेत.