नामपूर ब्राम्हण समाजातर्फे अमोल मिटकरींचा जाहीर निषेध करून व गुन्हा दाखल करण्याबाबत जायखेडा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार
सटाणा (संभाजी सावंत) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यांतील इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेत हजारो जनसमुदायासमोर बोलतांना ब्राम्हण समाज व हिंदू धर्मातील धार्मिक संस्काराबद्दल अत्यंत प्रक्षोभक आणि जातीयवादी तेढ निर्माण होईल अशी विधाने केली.
त्यामुळे सामाज्याच्या भावना दुखवाण्याचे प्रयत्न केल्याने जातीय, धार्मिक अशांतता निर्माण झाली असून भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, १५३ ,१५३अ, १६६, २६८, २९५, २९५अ ,२९८, अन्वये दखलपात्र आणि आजामीनपात्र गुन्हा दाखल करणेबाबत लेखी तक्रार जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना देण्यात आली. त्यावेळी ज्ञानेश्वर सजगुरे, संजय मोराणकर ,विवेक उपासनी ,श्रीपाद मोराणकर, चेतन देशपांडे, धनंजय देशपांडे, प्रसाद अग्निहोत्री, कवीश्वर भातखळे, श्रीपाद देशपांडे. आदि ब्राम्हण समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.