Daily Horoscope : आजचे राशिभविष्य, सोमवार २५ एप्रिल २०२२ !

मेष राशी : शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. माणसं जोडणे लाभाचे. शुभ रंग – नारिंगी
वृषभ राशी : संयम महत्त्वाचा. निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईगडबड टाळा. शुभ रंग – निळा
मिथुन राशी : प्रगतीची संधी मिळेल. नवा रोजगार मिळविण्याची संधी आहे. हुशारीने काम कराल. शुभ रंग – मोरपिशी
कर्क राशी : प्रगतीचा योग आहे. प्रामाणिकपणे नियोजन करून कष्ट करणे हिताचे. चुकीचे मार्ग टाळणे आणि कायदे-नियम पाळणे हिताचे. शुभ रंग – चंदेरी
सिंह राशी : आर्थिक नियोजन करणे आणि खर्च विचारपूर्वक करणे हिताचे. उधळपट्टीला आवर घालावा. शुभ रंग – किरमिजी
कन्या राशी : कतृत्वाच्या जोरावर प्रगती करा. खूषमस्करी आणि खोट्या प्रतिष्ठेपासून दूर राहा. शुभ रंग – पोपटी
तूळ राशी : कतृत्वाला चालना मिळेल. प्रगतीचा योग आहे. माणसं जोडणं हिताचं आहे. शुभ रंग – आकाशी
वृश्चिक राशी : जबाबदारी स्वीकाराल. हुशारीने प्रगती कराल. नियोजन लाभाचे. शुभ रंग – आकाशी
धनु राशी : इतरांपेक्षा स्वतःच्या प्रगतीला प्राधान्य देऊन नियोजन करणे. वास्तवाचे भान राखून क्षमतेनुसार नियोजन करणे हिताचे. शुभ रंग – सोनेरी
मकर राशी : शब्द जपून वापरा. कोणालाही आश्वासन किंवा वचन देताना पुन्हा विचार करा. वाद टाळणे, कायदे आणि नियम पाळणे हिताचे. शुभ रंग – राखाडी
कुंभ राशी : घरातल्यांना वेळ देणे, ज्येष्ठांची काळजी घेणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग – निळा
मीन राशी : आर्थिक नियोजन हिताचे. खर्च विचारपूर्वक करा. बचतीवर भर द्या. शुभ रंग – पिवळा



