जिल्हा परिषद शाळा आष्टे येथे शालेय पोषण आहाराचे वाटप
तळोदा (प्रतिनिधी) माहे ऑगस्ट २१ ते फेब्रुवारी २०२२ अखेर १५४ दिवसाचा शालेय पोषण आहार त्यात तांदूळ, मुगडाळ, हरभरा.हे शाळेतील १७९ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा आष्टे तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार. येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम वानखेडे उपाध्यक्ष रंजना नाईक, सदस्य फुलवंती पाडवी, मीना पाडवी, संगीता ठाकरे,संगीता मोरे व ग्रेडेड मुख्याध्यापक कैलास लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक दौलत रामोळे, मधुकर कांबळे,राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप वळवी, संगीता चौधरी यांनी शालेय पोषण आहार वाटपासाठी अतिशय सुंदर नियोजन केले व प्रत्येक येणाऱ्या पालकास विद्यार्थी उपस्थिती सूचना देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शालेय पोषण आहार वाटप करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी शाळेतील स्वयंपाकीण सुमनबाई वानखेडे आणि कमलबाई पाडवी यांनी सर्व विद्यार्थ्यांना समप्रमाणात विद्यार्थ्यांना व पालकांना शालेय पोषण आहार मोजण्यासाठी मदत केली.