भुसावळ शहरातील आनंद लाॅज छापा प्रकरण
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) शहरातील पांडुरंग टॉकीजच्या बाजूला हरीष फालक यांच्या मालकीची आनंद लाॅज येथे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना पैशांचे अमिष दाखवून जागा उपलब्ध करू देऊन देह व्यापारास प्रवृत्त करून देह व्यापार करून घेत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळातील आनंद लॉज वर छापा टाकून सात जणांवर कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी पोहेकॉ रमण सुरळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भुसावळ शहरातील पाडुरंग टॉकीजच्या बाजूला हरीष फालक यांच्या मालिकीची आनंद लॉज मध्ये राजेंद्र मुरलीधर नेमाडे व दीपेन रविंद्र सुरवाडे हे स्वतःचा आर्थिक फायद्याकरीता मुलींना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापाऱ्यांस प्रवृत्त करुन त्यांना आनंद लॉज मध्ये बोलावून जागा उपलब्ध करून देऊन देह व्यापार करून घेत आहे. या मिळालेल्या माहितीची खात्री करून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड व पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पाडुरंग टॉकीजच्या बाजूला आनंद लॉज मध्ये जाऊन पाहणी केली असता राजेंद्र मुरलीधर नेमाडे राहणार नंदनवन कॉलनी भुसावळ हरिष नामदेव फालक (रा. गायत्री मंदिरा जवळ भुसावळ), दीपेन रविंद्र सुरवाडे (रा. वानखेडे कॉलनी भुसावळ), शुभम दिनकर बरकले (रा. कुऱ्हा पानाचे) अकबर शहा कादर शहा (रा.दीनदयाल नगर भुसावळ), शेख सत्तार शेख जब्बार (रा. विवरे तालुका रावेर), मोहसीन गंभिर पिंजारी (रा. शिरसोली, जळगाव) असे इसम व महिला मिळून आले म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनला राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून गुरुन ०२०३/२०२२ भा.द वि.कलम ३७०,३,४,५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई प्रभारी आय.पी.एस अधिकारी आशीत कांबळे, सपोनि हरिष भोये, मसपोनी रुपाली चव्हाण, पोउपनिरी शांताराम महाजन, पोहेकॉ रमण सुरळकर, पोना यासिन पिंजारी, उमाकांत पाटील, संदीप परदेशी, मपोना अश्वीनी जोगी, पोकॉ प्रशांत परदेशी, सचिन चौधरी अशांनी मिळून केली. भुसावळ शहरात बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असे भरपूर लॉज मध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असून बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हाकेवर सुद्धा व्यवसाय सुरू असून काही पोलीस कर्मचाऱ्यांना व्ही.आय.पी.सुविधा मिळत असल्याने पोलीस प्रशासन याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अशीच कारवाई पोलिस प्रशासन सतत सुरू ठेवणार का?अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.