महाराष्ट्रराजकीय

आमदगाव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील आमदगाव येथील शिवसेना पदाधिकारी यांनी माजी महसुल कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रवेश करणाऱ्या मध्ये वैभव तिडके, उमेश खोंड, अमोल कोळी, विशाल तिडके, श्रीकृष्ण खोंड, ललित गावंडे, अर्जुन तोरे, आकाश गावंडे, विशाल तोरे, पवन कोळी, संभाजी खोंड, युवराज तिडके, हर्षल तिडके, सागर लोहार, तेजस तिडके यांचा समावेश आहे. यावेळी एकनाथराव खडसे मार्गदर्शन करताना म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष असुन जात पात न मानता सर्व जाती धर्माला समान संधी देणारा व विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. तुम्हा सगळ्यांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. आमदगावच्या विकासासाठी नेहमी निधी दिला असून भविष्यात सुद्धा विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, जिल्हा दूध संघ संचालक मधुकर राणे, हेमराज चौधरी, अनिल वराडे, सुभाष पाटीलयु डी पाटील, पवनराजे पाटील, रवींद्र दांडगे, संदिप जावळे, संदिप देशमुख, योगेश कोलते, संजय रल, सरपंच संभाजी पारधी, उपसरपंच मिलिंद गुरचळ, विष्णू किनगे, हेमराज पाटील, कडू पाटील, मनोज बोरले, चंद्रकांत पाटील, प्रसाद खोंड, अमर पारधी, आकाश किनगे, नयन आखरे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे