जनतेची कामे करणे हे माझे प्रथम कर्तव्य : आमदार रमेश बोरणारे
वैजापूर : मी आमदार झालो हे वैजापूर गंगापूर मतदार संघाच्या आशीर्वादामुळे म्हणून विकास कामे करणे हे माझे कर्तव्य असून मी आमदार या नात्याने सांगू इच्छितो की अशाच वेगवेगळ्या योजना प्रत्येक गावामध्ये आणून वैजापूर तालुका हा दुष्काळी भाग म्हणल्या जातो अशा वेगवेगळ्या योजना आणून हा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करीन, असं आमदार रमेश बोरणारे म्हणाले.
वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघासाठी पाणीपुरवठा विभागाकडुन जल जिवन मिशन योजनेसाठी आमदार रमेश बोरनारे यांनी “30 कोटी 30 लाख 41 हजार रुपये मंजुर करून आणलेल्या निधीपैकी आज टाकळीसागज, अगरसायगाव, मकरमतपुरवाडी, नांदगाव, खंबाळा, किरतपुर, नगिनापिंपळगाव व फकीराबादवाडी येथे “85 लाख 36 हजार रुपये निधी जल जिवन मिशन योजनेच्या चालू होणाऱ्या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपनगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, जि प सदस्य मनाजी मिसाळ, सभापती अंकुश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होते.