दीपनगर येथील विवाहिताची गळफास घेऊन आत्महत्या
दीपनगर (ओमशंकर रायकवार) येथील कामगार वसाहतीत इमारत नंबर नवीन ई टाईप २३/५ मधील रहिवासी इंडियन कँफेचे कर्मचारी मनोज पिल्लाई यांची पत्नी शरण्या पिल्लाई वय (२९) यांनी घरातील पंखावर ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शरण्या यांनी ज्यावेळी गळफास घेतला त्यावेळी त्यांचे पती मनोज हे घरातील दुसऱ्या खोलीत मुलासोबत खेळत होते. शरण्या यांचा पंख्याला लटकलेला मुत्यदेह स्वत: मनोज यांनी खाली उतरून गळ्यातील ओढणी कापलेली होती. शरण्या यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तमिळ भाषेत “मी नसल्यानंतर तुम्ही दोघे खुश रहावे”. असे लिहुन आत्महत्या करीत असल्याचे पत्र लिहिले आहे. असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती कळताच भुसावळ तालुका पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, सहाय्यक फौजदार शामकुमार मोरे, पोलीस हेडकाँस्टेबल प्रेम सपकाळे, पोलिस कर्मचारी अविनाश टहाकळे यांनी पंचनामा करून तालुका पोलिसात अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक वानखेडे यांनी सांगितले की घटनेची माहिती शरण्या यांच्या आई वडिलांना कळविले आहे. पुढील तपास सुरु आहे.