राकेश वाघ याने स्वतःचे बलिदान देऊन पाण्याच्या बोटीतल्या सहा चिमुकल्यांचे वाचवले प्राण
धुळे : धुळे एकवीरा देवी यात्रेत नेहमीप्रमाणे रात्रि साडेअकराच्या वेळेस जुने धुळे येथील रहिवासी असलेल्या चिमुकल्यांना खेळण्यासाठी पाण्यात बोटी असलेल्या ठिकाणी कामावर असलेल्या कै राकेश वंसत वाघ हा यात्रेतील पाण्याच्या हौदात चिमुकल्यांसाठी बोटींचा सफर करवत होता.
सहा ते सात चिमुकल्यांना त्याने बोटीत बसवले होते. अचानक त्याला यात्रेसाठी कान्ट्रेक्ट घेऊन लायटिंग ची व्यवस्था करणा-यांनी केलेली लायटिंगची वायर वरून तुटली व ती कोणत्याही क्षणी पाण्यात कोसळणार असल्याचे दिसले. त्याक्षणी त्याने होणा-या गंभीर घटनेचा तत्काळ अंदाज लावत स्वताच्या जीवाची पर्वा न करता क्षणाचाही विलंब न लावता तो स्वतः पाण्याच्या हौदात उतरला आणि भराभर त्याने बोटीतून उचलून मुलांना बाहेर टाकले आणि शेवटच्या लहानग्या मुलीला ही बाहेर टाकले. त्याच वेळेस त्याचा पाय सटकला आणि करंट असलेली तुटलेली वायर पाण्यात पडली आणि राकेश (गोलु) ही पाण्यात पडला आणि विजेचा प्रचंड धक्का लागून गतप्राण झाला.
कष्टकरी कुटूंबातील राकेश हा मुलगा फक्त 22 वर्षाचा मुलगा. रोजंदारीचे काम करून परीवाराला मदत करायचा. सामाजिक कार्यात नेहमी भाग घ्यायला लोकांसाठी सतत धावून जायचा. स्वताच्या कुटूंबाचा विचार न करता आज दुसऱ्यांचे जीव वाचवतांना त्याने स्वतःचे बलिदान दिले.



