एकनाथराव खडसे, रोहिणी खेवलकर यांच्या प्रयत्नाने मुक्ताईनगर, बोदवड नगरपंचायत हद्दीत विकास कामांसाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर
बोदवड (सतीश बावस्कर) माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्याकडे मुक्ताईनगर आणि बोदवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती.
त्याविषयाला अनुसरून एकनाथराव खडसे आणि रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी उपमुख्यमंत्री ना अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री प्रसाद तनपुरे यांच्याकडे मुक्ताईनगर व बोदवड मधील विविध प्रभागात विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत दि. 19 एप्रिल 2022च्या शासन निर्णयानुसार मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामे करण्यासाठी 2 कोटी 90 लक्ष रुपये आणि बोदवड नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामे करण्यासाठी 2 कोटी 10 लक्ष रुपये निधी मंजुर झाला असून यातून खालील विकास कामे करण्यात येतील
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत करावयाची विकास कामे
1) मुक्ताई नगर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र 16 मध्ये मनोहर काळे यांच्या घरापासून ते योगेश झांबरे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रोड बांधणे
2) प्रभाग क्र 16 मध्ये तुकाराम चौधरी ते डॉ बोडे ते श्रीराम जैस्वाल यांच्या घरापर्यंत आर सी सी गटार धापा बांधकाम करणे
3) प्रभाग क्र 16 मधील राजहंस टायपिंग ते अजय फडणीस ते किशोर सैतवाल यांच्या घरापर्यंत आर सी सी गटार धापा बांधकाम करणे
4)प्रभाग क्र 16 मध्ये वर्धमान रेसिडेन्सी ते अशोक पाटील ते राजू कोलते ते राजेंद्र हिवराळे यांच्या घरापर्यंत आर सी सी गटार व धापा बांधकाम करणे
5) प्रभाग क्र 16 मध्ये सदाशिव चव्हाण ते हनुमान मंदिर पर्यंत आर सी सी गटार व धापा बांधकाम करणे
6) प्रभाग क्र 5 मध्ये सत्तार अब्बास खान यांच्या घरापासून ते नूर मोहम्मद खान यांच्या घरापर्यंत गटार धापा बांधकाम करणे
7) प्रभाग क्र 5 मध्ये महावीर मेडिकल पासून नागेश्वर मंदिरा पर्यंत आर सी सी गटार व धापा बांधकाम करणे
8) प्रभाग क्र 5 मध्ये राजू ब्रह्मक्षत्रिय यांच्या घरापासून ते डी वाय एस पी ऑफिस पर्यंतआर सी सी गटार व धापा बांधकाम करणे
9) प्रभाग क्र 5 मध्ये पाण्याचा हौद बांधकाम करणे
10) प्रभाग क्र 13 मध्ये संदिप पाटील यांच्या घरापासून ते बाविस्कर सर ते विठ्ठल जोगी यांच्या घरापर्यंत
आर सी सी गटार व धापा बांधकाम करणे
11) प्रभाग क्र 13 मध्ये लोखंडे पेंटर यांच्या घरापासून विनोद काटे ते कांडेलकर यांच्या घरापर्यंत आर सी सी गटार व धापा बांधकाम करणे
12) प्रभाग क्र 10 मध्ये मरकस मज्जीद ते उजव्या साईड पासून ते कलीम शहा ते बि एन खान यांच्या घरापर्यंत लादीकरण करणे
13) प्रभाग क्र 10 मध्ये मण्यार मज्जीदचे मागील बाजूस व पुढील बाजूस लादीकरण करणे
14) मुक्ताईनगर प्रभाग क्र 10 मध्ये इकबाल सर यांच्या घरापासून ते शकील किराणा पर्यंत आर सी सी गटार व धापा बांधकाम करणे
15) मुक्ताईनगर प्रभाग क्र 11 मध्ये मजीद बेपारी यांच्या घरापासून ते सुलतान शेठ यांच्या घरापर्यंत आर सी सी गटार व धापा बांधकाम करणे
16) मुक्ताईनगर प्रभाग क्र 11 मध्ये आमद छोटू यांच्या घरापासून हुसेन खाटीक यांच्या घरापर्यंत आर सी सी गटार व धापा बांधकाम करणे
17) मुक्ताईनगर प्रभाग क्र 8 मधील बुद्धविहार दुरुस्ती करणे
18) मुक्ताईनगर प्रभाग क्र 13 मध्ये पुनर्वसन टप्पा क्र 3 येथे पत्राचा डोम बांधकाम करणे
19) मुक्ताईनगर प्रभाग क्र 13 मध्ये महेश इंगळे यांच्या प्लॉट पासून अरुण वराडे यांच्या घरापर्यंत काँक्रीट गटार बांधकाम करणे
20) मुक्ताईनगर प्रभाग क्र 9 मध्ये शरीफ खाटीक यांच्या घरापासून ते खलील मिस्त्री यांच्या घरापर्यंत आर सी सी गटार धापा बांधकाम करणे
21) मुक्ताईनगर प्रभाग क्र 9 मध्ये बाळू जयकर यांच्या घरापासून ते वाहेद हसन यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे
22) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र 13 मध्ये बोदवड रोड ते निळकंठ महाजन यांच्या प्लॉट पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे
बोदवड नगरपंचायत हद्दीत करावयाची विकास कामे
1) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.2 मध्ये प्रमोद पाटील यच्या घरापासून ते बालसंस्कार केंद्र पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे
2) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 3 मध्ये विविध ठिकाणी रस्ता ट्रीमिक्स कॉक्रीटीकरण करणे
3) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 4 मध्ये मन्सूर बागवान यांचे घरापासून ते रहीम बागवान यांचे घरापर्यंत रस्ता ट्रीमिक्स कॉक्रीटीकरण करणे.
4) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 7 मध्ये विविध ठिकाणी रस्ता ट्रीमिक्स कॉक्रीटीकरण करणे.
5) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 8 मध्ये विविध ठिकाणी रस्ता ट्रीमिक्स कॉक्रीटीकरण करणे.
6) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 14 मध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे व हायमास्ट लाईट बसविणे ( एल.ई.डी. दिवे वगळून )
7) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 15 मनुर रोड येथे सार्वजनिक सभागृह बांधकाम करणे व वाल कंपाऊंड बांधकाम करणे.