सुदामवाडी सरपंच व ग्रामसेवकमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्यास धोका
बोरसर : सुदामवाडी येथील जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा असून देखील शाळेतील विद्यार्थ्यांना जो पोषक आहार दिला जातो. तो आहार बनवण्यासाठी शाळेसाठी असलेली टाकीत तीन दिवसापासून पाणी नाही व सरपंच व ग्रामसेवक यांना लेखी स्वरूपाचे निवेदन देण्यासाठी शाळेची कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार हे वारंवार कार्यालय बंद असल्यामुळे त्यांनी सरपंच ग्रामसेवक यांच्याशी फोन द्वारे माहिती देऊन ही कुठल्याही प्रकारचे दखल घेतली जात नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपासून पाचशे फूट अंतरावर असलेल्या हातपंपावर ती विंचू काट्यांमध्ये अनवाणी पाणी पिण्यासाठी आपल्याला जीव धोक्यात घालावा लागत आहे. दि. ९ एप्रिल २०२२ रोजी ग्रामसेवक घोडेकर यांना फोनद्वारे पूर्ण कल्पना देऊनही आज सोळा दिवस पूर्ण झाले असून सुद्धा याची कोणीही दखल घेत नाही व शाळेत फिल्टर बसवलेले असून विद्यार्थ्यांना दूषित पाणी पिण्यासाठी बळी पडावे लागत आहे व तसेच ४६ अंश सेल्सियस तापमान असल्यामुळे शरीराला पाण्याची प्रचंड प्रमाणात गरज असते.
दरम्यान दि. २५ एप्रिल २०२२ रोजी शाळेत आहार घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी रोजच्याप्रमाणे शाळेपासून पाचशे फूट अंतरावर असलेले पंपावर पाणी पिण्यासाठी उन्हामध्ये जावे लागत आहे. प्रचंड प्रमाणात उष्णता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीराला पाणी न मिळाल्यामुळे उष्माघात घात झाल्यास याला जबाबदार सरपंच ग्रामसेवक राहील असे शालेय कमिटी अध्यक्ष व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितले.