महाराष्ट्र

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनात बदल होणार नसेल तर शिक्षण निरर्थक ; आ. देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली खंत

वरूड (रुपेश वानखडे) शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे,असे बाबासाहेब सांगतात. विद्यार्थी प्राध्यान्याने शिक्षण आत्मसात करतो. पण शिक्षण आत्मसात केल्यानंतर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जर त्यांच्या जीवनात बदल होणार नसेल तर हे शिक्षण उपयोगाचं राहत नाही. हे निर्थक होतं. एवढं मोठं शिक्षण घेवून जर आमची लेकरं अर्धपोटी उपाशी राहत असेल..एवढं शिक्षण घेवून जर बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असेल तर ही फुले- शाहू- आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात फार मोठी दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत आ.देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.

ऑर्गनायझेशन फाॅर राईटस ऑफ ह्युमन शाखा-अमरावती च्या वतीने वरूड येथील गजानन महाराज मंदिर सभागृह येथे ‘आदिवासी एकता परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषेचे उद्घाटन वरूड- मोर्शी चे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ‘ऑफ्रोह’चे अमरावती जिल्हाध्यक्ष यशवंत वरूडकर हे अध्यक्षस्थानी होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, ऑफ्रोहचे उपाध्यक्ष प्रा. देवराव नंदनवार, कोषाध्यक्ष मनीष पंचगाम, महिला आघाडी च्या राज्याध्थक्ष अनघा वैद्य, महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष निलीमा केदारे, ऑफ्रोह चे मार्गदर्शक डाॅ.दिपक केदारे, जिल्हा सचिव नरेंद्र ढोलवडे,अखिल भारतीय आदिवासी मानेवर समाजाचे मोहन नायडू, आदिवासी कोळी समाजाचे नंदकिशोर रायबोले, आदिवासी राज समाज संघाचे राम पिंजकार, धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक राजेंद्र काळमेघ, आदिवासी ठाकूर समाज सुधार संघाचे सान्नि चौहान, आदिवासी माना समाजाचे प्रतिनिधी मंगेश गजबे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

आ.भुयार पुढे म्हणाले, मला वेळेअभावी विधानसभेत केवळ तीनच प्रश्न मांडण्याची संधी मिळाली.त्यातही पहिला प्रश्न आपल्या समाज बांधवांचा मांडला. दुदैवाने आपल्या समाजाचा एकच आमदार आहे. पण त्यांच्यावर ‘विशिष्ट जागेचं’ दडपण असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी ऑफ्रोहचे राजयाधयक्ष,शिवानंद जी सहारकर, कार्याधयक्ष राजेश सोनपरोते, ऑफ्रोहचे मार्गदर्शक डाॅ.दिपक केदारे, परिषदेचे अध्यक्ष व अमरावती जिल्हाध्यक्ष यशवंत वरूडकर यांनीही उपस्थितांना संबोधीत केले.

वरूड परिसरातील व नागपूर अमरावती वर्धा जिल्ह्यातील 400-450 कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी आमदार भुयार यांचा शाल आणि श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आ.भुयार यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला बद्दल धनराज टिकस यांचा तर डॉ. कीर्ती राम पिंजरकर यांचा डाॅक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल तसेच ललित नंदनवार यांचा ऑफ्रोह संघटने मध्ये चांगल्या कामाबद्दल सत्कार करण्यात आला. परिषदेची प्रस्तावना जिल्हा सचिव नरेंद्र ढोलवडे यांनी केली.तर सूत्रसंचालन मीना सोनकुसळे यांनी केले. आभार प्रदर्शन ललित नंदनवार यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे