कदमवाडीतील जळीतग्रस्त कुटुंबाला हुतात्मा नानकसिंग विद्यालयामार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
शित्तूर -वारुण : तालुक्यातील शाहूवाडी पैकी कदमवाडीतील जळीतग्रस्त कुटुंबाला सोनवडे ता.शिराळा येथील हुतात्मा नानकसिंग विद्यालयामार्फत सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले .
कदमवाडीतील घराला 30 मार्च रोजी अचानक सॉर्टसर्किट ने लागलेल्या आगीत सात कुटुंबाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. पशुधन तसेच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. गोठ्यातील जनावरांचा जीव वाचवताना गंभीर दुखापत झालेले नामदेव कदम हे उपचार चालू असताना ८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. गावातील, परिसरातील लोकांनी तसेच संस्था यानी यथाशक्ती मदत केली. पण दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कदम कुटुंबियांना सावरण्यासाठी समाजातून मदतीचा ओघ चालू राहायला पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हुतात्मा नानकसिंग विद्यालयाने जीवनावश्यक वस्तूंची मदत करून दुःखाचा डोंगर कोसलेल्या कदम कुटुंबियांना सावरण्यासाठी मदतीचा हात दिला.
कदम कुटुंबियांना मदत वाटप करतेवेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.ए.गायकवाड, पर्यवेक्षक एस.टी.पाटील, पत्रकार तथा वरिष्ठ लिपिक जी.जी.पाटील, नेताजीराव जगताप, राजेंद्र पाडवी, जीवन देसाई, वि. मं. राऊतवाडीचे मुख्याध्यापक सुरेश महिंदकर उपस्थित होते.