माय हॉलिडे वॉटर पार्क खानदेशच्या इतिहासात सोनेरी पान
धुळे : ऐतिहासिक लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या हॉलिडे वॉटर पार्क हा धुळे जिल्ह्यासह खानदेशाच्या इतिहासात भर पाडणारा आहे. धुळे शहरापासून सात किलोमीटर अंतरावर, मुंबई-आग्रा महामार्गाच्या काठावर, किल्ल्याच्या पायथ्याशी आणि डोंगरांच्या कुशीत हा वॉटर पार्क आहे. गोंगाटापासून दूर आणि शहराजवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी असलेला हा वॉटर पार्क खान्देश वासियांची आता पहिली पसंती ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई-आग्रा आणि सुरत-नागपूर, अशा दोन राष्ट्रीय महामार्गांवर वसलेल्या धुळे शहर आणि जिल्ह्याचा आजवर म्हणावा तसा विकास झाला नाही. शेती आणि उद्योग क्षेत्रात फारशी प्रगती झाली नाही. परंतु परिस्थितीत बदल करण्याची मानसिकता आता या जिल्ह्यातील तरुण वर्गात निर्माण झाली आहे. सध्या धुळे जिल्ह्यात जे काही उद्योग उभे राहिले ते तरुणांच्या हिमतीमुळे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तरुणांच्या कार्यकर्तृत्वात धुळ्यातील काही तरुणांनी भरली घातली आहे. खानदेशच्या इतिहासात लळिंग किल्ल्याचा हमखास उल्लेख होतो. मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या लळिंग किल्ल्याची सुधारणा राज्याच्या पर्यटन खात्याने केली आहे. किल्ल्याचे बुरुज, तटबंदी सुधारण्यात आली आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता विकसित करून पायऱ्या बांधण्यात आल्या. किल्ला विकसित झाल्याने अनेक जण पर्यटनासाठी किल्ल्यावर पोहोचू लागले. याच किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण करीत उद्योग उभारणी दोन वर्षांपूर्वी सुरु झाली. धुळे शहरातील तरुणांनी एकत्र येऊन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली बरड जमीन विकसित केली. सुमारे आठ एकर क्षेत्रात माय हॉलिडे आणि वॉटर पार्कची उभारणी करण्यात आली आहे. आशिया खंडात वॉटर पार्क उभारणीत आघाडीवर असलेल्या अरिहंत कंपनीच्या माध्यमातून हा वॉटर पार्क उभारण्यात आला आहे.
थरारक अनुभव देणाऱ्या स्लाईड
वॉटर पार्क पडले की प्लेस्टेशन आणि चित्तथरारक अनुभव देणाऱ्या स्लाईड्स येतात. हा अनुभव माय हॉलिडे वॉटर पार्क मध्ये प्रत्येकाला घेता येणार आहे. प्ले स्टेशनची उभारणी गोलाकार असलेल्या सुमारे सात हजार चौरस फूट जागेत करण्यात आली आहे. प्ले स्टेशन मधील स्लाईड्स सुमारे तीस फूट उंच आहेत. अगदी शाळकरी मुलांपासून साठ वर्षांच्या तरुण वृद्धांना या प्ले स्टेशनचे आकर्षण होईल. कमी-अधिक उंचीवरून थेट प्ले स्टेशनच्या पाण्यात येता येईल, अशा स्लाईड्स उभारण्यात आल्या आहेत.
माय हॉलिडे वॉटर पार्कमध्ये जवळपास तीस फूट उंचीवरून पाण्यात अलगत सोडणाऱ्या सहा स्लाईड आहेत. यातील एक स्लाईड तीस फूट उंचीवरून केवळ तेरा सेकंदात बंदुकीच्या गोळीच्या वेगाने पाण्यात नेऊन सोडते.. गुहेतून प्रवास होत असल्याची अनुभूती एका स्लाईड्समध्ये येते. तसेच एकाच वेळी दोन जणांना फुग्यावर स्वार होऊन स्लाईडवर राईड करता येते. पेंडुलम पद्धतीची ही स्लाईड फार कमी वॉटर पार्कमध्ये आहे. याच ठिकाणी लहान मुलांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. बदकाच्या चोचीतून स्लाईड उभारण्यात आली आहे. छत्री वरून अलगद हळुवारपणे खाली येणाऱ्या पाण्यात भिजताना लहान मुलांना अविस्मरणीय आनंद मिळतो. शिवाय या ठिकाणी दोन वॉटर गन ठेवण्यात आल्या आहेत. खोडकर असलेली मुले वॉटर गन मधून एकमेकांवर पाण्याचा मारा करतात.
रेन डान्स प्लॅटफॉर्म
वॉटर पार्कमध्ये रेन डान्स हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. माय हॉलिडे वॉटर पार्कमध्ये सुमारे चाळीस फूट व्यासाचा गोलाकार प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. या ठिकाणी रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद घेता येतो. याच प्लॅटफॉर्म जवळ अत्याधुनिक संगीत व्यवस्था आहे. रिमझिम कृत्रिम पावसात भिजताना शाळकरी मुले, तरुण आणि मध्यम वयस्कर तिथे थिरकल्या शिवाय राहत नाही. पाण्याच्या सरी अंगावर घेत अनेक तरुण येथे बेधुंद होऊन नृत्त्याविष्कर घडवितात. वॉटर पार्कमध्ये अल्पोपहार आणि भोजनासह अन्य खाद्य पदार्थांची सुविधा आहे. सकाळी दहाला वॉटर पार्कमध्ये आलेल्या व्यक्तीस संध्याकाळी पाच केव्हा वाजले, हे समजत नाही. धकाधकीच्या आणि ताण-तणावाच्या परिस्थितीतून काही काळ बाहेर पडण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक पातळीवर ताजेतवाने होण्यासाठी माय हॉलिडे वॉटर पार्क, हे सर्वोत्तम ठिकाण ठरेल, यात शंका नाही.