रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्हा युनिटच्या अध्यक्षपदी रत्नाकर पाटील यांची नियुक्ती
नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या हिताचे संरक्षण करून त्यांना न्याय देणे तसेच फेडरेशनची वाढ, विकास एवं वृध्दी होणेसाठी ना. रामदास आठवले, अध्यक्ष रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या आदेशान्वये नंदुरबार येथे शासकीय सेवेत कार्यरत असलेले रत्नाकर पाटील यांची नियुक्ती रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्हा युनिटच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र आत्माराम पाखरे, केंद्रीय सरचिटणीस, रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन, मुंबई यांनी दिले आहे.
सदर नियुक्तीपत्र रत्नाकर पाटील यांना रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ) नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद कुंवर, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ) नंदुरबार युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ) नंदुरबार जिल्हासचिव राम साळुंके आणि रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ) नंदुरबार वाहतुक आघाडी जिल्हाध्यक्ष मितुल श्रॉफ यांनी प्रदान केले.