पीआय राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशान्वये आणि पोलीस मित्र यांच्या सहकार्यामुळे बोदवड येथे आठवडे बाजाराने घेतला मोकळा श्वास
बोदवड (सतीश बावस्कर) तालुक्यातील आठवडे बाजार पंचक्रोशीतील मोठा बाजार आहे बुधवारी भरणाऱ्या ह्या बाजारात नगरपंचायतीचे वतीने दुकानदारांना मोठे ओटे तयार करून दिले आहे. मात्र जामठी रोडवरील काही हात गाडी दुकानदार व्यवसायिक भाजीपाला विकणारे रस्त्यामध्ये बसत असतात.
त्यामुळे नागरिकांना महिलांना त्रास होत असे वाहतूक अडचणी निर्माण होतात याची दखल घेत बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व पोलीस मित्र यांनी धडाकेबाज कारवाई केली असून त्यामुळे नागरिकांनी या कृतीचे कौतुक केले आहे.
पोलीस कर्मचारी व पोलीस मित्र यांनी पुढाकार घेतला बाजारात सूट सुटीत पणा आल्यानंतर आता पाकीटमार तसेच भुरट्या चोऱ्या करणे यामुळे बंद होण्यास मदत होणार आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी बाजारातील व्यवसायिकांना आवाहन केले आहे की रस्त्यामध्ये दुकान लावू नये नागरिकांना महिलांना बाजारात जाण्यासाठी रस्ता द्यावा व पाकीटमार चोरटे असतील तर पोलिसांना कळवावे असे आव्हान त्यांनी केले आहे. यावर जर कोणी अतिक्रमण करुन दुकान लावून रहदारीस अडथळा निर्माण केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिस कर्मचारी उपस्थित होते व पोलीस मित्र उपस्थित होते.