पोलीस आयुक्तपदावरुन बदली झाल्याने कृष्ण प्रकाश यांची सूचक पोस्ट
मुंबई (वृत्तसंस्था) पोलीस आयुक्तपदावरुन बदली झाल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी इन्स्टाग्रामवर शायरीमधून सूचक शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केलीय. सध्या त्यांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या व्हीआयपी सुरक्षेच्या पोलीस महानिरीक्षकपदी असलेले पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त असणाऱ्या कृष्ण प्रकाश हे तडकाफडकी बदलीवरून नाराज आहेत. अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच बारामती येथे जाऊन भेट घेतली. तिथे त्यांनी कौफियत मांडल्याची चर्चा आहे. बदली कुठल्या कारणामुळे झाली याचा शोध सध्या कृष्ण प्रकाश घेत आहे. दरम्यान, कृष्ण प्रकाश आपली नाराजी लपवू शकले नाहीत.
तडकाफडकी बदली केल्याने कृष्ण प्रकाश नाराज आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन कैफियत मांडली. ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली तशी त्यांच्या बदलीला स्थगिती मिळेल असं त्यांना वाटलं. पण, शरद पवार यांच्या भेटीतून काही साध्य झालं नसल्याचं बोललं जात आहे. व्हीआयपी सुरक्षेच्या पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाल्यावरून कृष्ण प्रकाश नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. कृष्ण प्रकाश हे उघड उघड नाराजी व्यक्त करत नसल्याच पाहायला मिळतंय. त्यांना अनेकदा फोन करून बदली विषयी विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद देण्यात आला नाही. तेच कणखर आयर्नमॅन कृष्ण प्रकाश आता इंस्टाग्रामचा आधार घेऊन शायरीमधून भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे वेषांतर करून कारवाई करण्यात आघाडीवर होते. गेल्या आठवड्यात गृह विभागाने बदल्यांचे आदेश काढले, यात कृष्ण प्रकाश यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली. बदली झाली तेव्हा कृष्णप्रकाश ते परदेशात होते. त्यांच्या जागी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा तातडीने पदभार स्वीकारला आहे. याच बदलीबद्दल नाराजी व्यक्त करत कृष्ण प्रकाश यांनी इन्स्टाग्रामवरुन, ‘वक्त आता है और जाता है’, असं म्हणतं ही कठीण वेळ ही निघून जाईल असं म्हटलंय.
इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे?
कृष्ण प्रकाश यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते शेरोशायरीमधून व्यक्त झालेत. एका पोस्टमध्ये त्यांनी, ‘मेरे पसीने से मेरे मेहनत की खुशबू आती है! मेरा लहू मेरे रगो मैं इमान का रंग भरता है! ऐ दौर की दुश्वारिया युं न इतरा मेरे हालात पे! वक्त तो वक्त है, आता और जाता है!,’ अशा असायची शायरी शेअर केलीय.