संत गोरोबा कुंभार पुण्यतिथी सोहळा उत्साहात सपंन्न
शित्तूर वारुण : सोनवडे (ता.शिराळा) येथे संत गोरोबा कुंभार समाज मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेला संत गोरोबाकाका कुंभार यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.

सोनवडे येथे संत गोरोबाकाका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिम्मीत्त किर्तन ,हरीपाठ भजन यासारख्या धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये प्रामुख्याने ह.भ.प.बाजीराव जाधव महाराज,सोनवडे,ह.भ.प-अनिल देवळेकर महाराज(मणदुर) यांनी आपल्या किर्तनातुन समाज प्रबोधन केले.याचबरोबर संत गोरोबाकाका कुंभार यांच्या प्रतिमेची पालखीतुन टाळ मृदुंगाच्या गजरात सोनवडे गावातुन मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये वारकरी, महीला, पुरुष युवक-युवती आणि गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दरम्यान सकाळी ११ वाजता गोरोबाकाका कुंभार यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करुन पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी ह.भ.प-दादु कुंभार, सरपंच-रविंद्र यादव, भगवान पाटील, जी.जी.पाटील यांच्या सह गावातील ग्रामस्थ महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थीत होते. तसेच यावेळी कुंभार समाज बांधवाच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात. सोनवडे येथील दादु कुंभार, बाबासो कुंभार, प्रकाश कुंभार, सचीन कुंभार, मच्छिंद्र कुंभार, संग्राम कुंभार, गोरख कुंभार, महादेव कुंभार, राजाराम कुंभार, विठ्ठल कुंभार यांचेसह सर्व कुंभार समाज लहान थोर समाजबांधवानी परीश्रम घेऊन पुण्यतिथी सोहळा यशस्वी केला.






