विजेचा लपंडावाने छोटे व्यवसाय अडचणीत
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) विजेच्या अघोषित लोडशेडिंग मिर्च मसाला व पापड उद्योगाला मोठा फटका बसत असून कोळगाव पिपरी हाट तालुका भडगाव येथील विजय हिम्मतराव पाटील यांच्या तिसऱ्या पिढीपासून मिर्ची कांडप उद्योग सुरूआहे. त्याला जोड धंदा म्हणून तीन वर्षापासून पापळ उद्योग चालू केला आहे. जानेवारी ते जून पर्यंत चालणारा हा व्यवसाय विजेचा लपंडाव आणि अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सकाळ पासून नंबर लावून बसलेल्या महिलांना काही वेळेस मुक्कामी थांबावे लागते. या सर्व गडबडीत महीलांना मोफत जेवण व थंड पाण्याची व्यवस्था विजय पाटील हे स्वखर्चाने खर्च करतात. त्यांच्याकडे दुय्यम व्यवसाय म्हणून शेती आहे. पाटील यांचे संपूर्ण कुटुंबदिवसभर या कामात व्यस्त असतात मात्र विजेच्या संकटांनी त्यांचे काम अधिकच वाढत आहे.
कोळगाव, शिंदी, तरवाडे, शिवरे, देवगाव, पळासखेडे, सावदे, खेडगाव, पांढरत, पिचडे, बोदर्डे, सावदे, गोंडगाव, घुसर्डी, पाथर्डी, कजगाव, नावरे, दलवाडे येथील जवळपास पंचवीस ते तीस गावांचा संपर्क येतो ग्राहकांच्या सोयीसाठी हा उद्योग जिवंत ठेवत असल्याच्या भावना विजय पाटील यांनी व्यक्त केल्या.