राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर ; औरंगाबादच्या सभेसाठीही परवानगीसह ‘या’ अटी शर्ती लागू
मुंबई (वृत्तसंस्था) मनसेप्रमुख राज ठाकरे हे आजपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी राज ठाकरे यांचा दोन दिवस मुक्काम असेल. यावेळी राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर येथूनच राज ठाकरे (Raj Thackeray) १ मे रोजी औरंगाबाद येथील सभेसाठी रवाना होतील.
मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राज्यातील राजकारण तापलेलं असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा जाहीर केला आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. 29, 30 एप्रिल रोजी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. औरंगाबादच्या सभेला पुण्यातून राज ठाकरे होणार रवाना होणार आहेत. इतकंच नाही तर 3 मे रोजी होणाऱ्या महाआरतीसंदर्भात देखील नियोजन करण्यात आलेलं आहे. महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशन मध्ये पत्र देण्याचे काम सुरु आहे. मनसे शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.
औरंगाबादमध्ये जाहीर सभा
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अटीशर्तींसह परवानगी मिळाली आहे. पण या सभेला अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. सभेसाठी केवळ 15 हजार जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभेला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या सभेसाठी पोलिसांनी 15 अटी घातल्या आहेत. त्यामुळं 1 मे रोजी होणारी सभा राज ठाकरेंना अटींचं पालन करुनच घ्यावी लागणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. मनसेकडून मंडप उभारणीला सुरुवात झाली आहे. मनसे बाळा नांदगावकर यांच्या पाठोपाठ आता मनसे नेते नितीन सरदेसाई हेसुद्धा औरंगाबादेत आहेत.
‘राज’सभेसाठी पोलिसांच्या अटी
1. सभा संध्याकाळी 4.30 ते रात्री 21.45 वेळेतच आयोजित करावी, कार्यक्रमात कोणताही बदल करु नये
2. वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म यावरुन चिथावणी देणारं विधान करु नये
3. सभेत कुणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये
4. सभेसाठी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, निर्धारित ठिकाणीच पार्किंग करावं
5. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शनही करु नये
6. अट 2, 3 आणि 4 बाबत सभेत सहभागी होणाऱ्यांना आयोजकांनी कळवावे
7. सभेतील स्वयंसेवकांची नावे, मोबाईल नंबर तसेच बाहेरुन येणाऱ्यांची अंदाजित संख्या एक दिवस अगोदर पोलिसांना कळवावी
8. सभेसाठी 15 हजारहून अधिक लोकांना निमंत्रिक करु नये, काही गोंधळ झाल्यास आयोजक जबाबदार राहतील
9. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या जागी बॅरिकेट्स उभारावे
10. सभेसाठी आवाजाची मर्यादा 75 डेसिबल इतकी ठेवावी लागणार