महाराष्ट्र
संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत ९५ प्रकरण मंजूर
बोरद (योगेश गोसावी) तळोदा येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत ९५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीला उपस्थित, प्रवीण वळवी, अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती, सदस्य. निशा वळवी, सचिन राहसे, सतीवन पाडवी, धर्मेंद्र वळवी, नाथा पावरा, जितेंद्र दुबे, नितीन वखारे, तहसीलदार शैलेश गवते, नायब तहसीलदार उपस्थित होते.
२० इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, ४१ श्रावण बाळ योजना, ३४ संजय गांधी निराधार योजना, असा एकूण ९५ प्रकरण मंजूर झाले आहे तर ३८ प्रकरण नामंजूर करण्यात आले.