स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत प्रभाग रचना अधिकाऱ्यांकडून निवडणूक विभागाच्या आदेशाचे उल्लंघन
शहापूर : बोरशेती- कळंभे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये मागील २०१६ च्या निवडणुकी पासून २०११ चा सेन्से्स रिपोर्ट नुसार बोरशेती खुर्द ची लोकसंख्या ७३७ असून एकूण अनुसूचित जमाती लोकसंख्या १८२ इतकी असल्याचे दिसत आहे. परंतु बाजूच्या देवीचा पाडा येथील ८४ नागरिकांना स्व फायद्यासाठी मागील निवडणुकी मध्ये त्यांच्या दळणवळणाचा कोणताही विचार न करता कळंभे मध्ये दाखविण्यात आले आहे.
तसेच सेन्से्स २०११ नुसार बोरशेती बुद्रुक येथील ६५९ लोकसंख्या कळंभे येथील असल्याचे दाखविल्यामुळे बोरशेती बुद्रुक हा स्वतंत्र वॉर्ड असायला हवा होता परंतू त्यांचे अस्थित्व संबंधित लोक प्रतिनिधींच्या संगनमताने अधिकाऱ्यांनी प्रभाग रचने मध्ये फेर बदल करून नागरिकांना अंधारात ठेऊन त्यांची फसवणूक केली आहे, करत आहेत. त्याचप्रमाणे चालू वर्षाच्या निवडणूक प्रभाग रचने मध्ये सुद्धा जाणूनबुजून फेर बदल केला असल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक अविनाश धर्मा वेखंडे , महेश शंकर कशिवले, सचिन संतोष बांगर यांनी हरकत घेतली असता अर्जदार सुनावणीस हजर होते परंतु शासनाने ऐन वेळेस निर्णय बदलून स्थगिती दिल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. सध्यस्थितीत पुन्हा एकदा प्रभाग रचना कार्यक्रमाचे नियोजन करण्यास शासनाकडून सूचना आल्या आहेत. त्या नुसार ग्रामस्थांच्या वतीने शहापूर तहसील कार्यालयामध्ये स्मरण पत्र दिले आहे. तसेच बोरशेती बुद्रुक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आदेश पत्र व नियमानुसार प्रभाग रचना न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.