आरोग्य व शिक्षण

कोरोना लसीकरणाबाबत NTAGI ची दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना ; जाणून घ्या..!

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना 9 महिन्यांपूर्वीच बूस्टर डोस देण्यात यावा, असे सुचविले आहे. गुरुवारी सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकासाठी बुस्टर डोसच्या संबंधित अंतराच्या कालावधीत कोणताही बदल झालेला नाही. तथापि, या मुद्द्यावर आरोग्य तज्ज्ञांचे संमिश्र मत आहे की, बूस्टर डोसशी संबंधित वेळ मध्यांतर कमी करणे आवश्यक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशातील फार कमी लोकांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना बूस्टर डोस लागू करण्याची परवानगी दिली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड-19 नॅशनल टास्क फोर्सचे उपाध्यक्ष डॉ. राजीव जयादेवन यांच्या मते, कोविड संसर्गाविरूद्ध प्राथमिक लसीकरण आणि तिसरा डोस यामध्ये जास्त अंतर नसावे. कारण लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर जास्त असेल, कोरोनासोबत लढण्याची तीव्रता कमी होईल.

बंगळुरू येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अँड सोसायटी या संस्थचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी म्हटले आहे की, लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 5-6 महिन्यांपर्यंत कमी केले पाहिजे. कारण बुस्टर डोस हा 9 महिन्यांच्या आधी मिळायला हवा. दरम्यान, 10 एप्रिलपासून देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस लागू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी कोरोना लसीचा दुसरा डोस आणि तिसरा डोस यामध्ये 9 महिन्यांचे अंतर असावे, असा नियम बनविण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे