महाराष्ट्र
शिंदखेडा येथील योगिनी परदेशी यांना उत्कृष्ट ब्युटी पार्लर योगदानाबद्दल अहमदाबाद येथे गौरव
शिंदखेडा : येथील गायत्री ब्युटी पार्लर च्या संचालिका योगिनी योगराज परदेशी यांच्या ब्युटी पार्लर या क्षेत्रात असणारे उत्कृष्ट योगदानाबद्दल नुकताच संपन्न झालेल्या अहमदाबाद येथील नारायणी हाईट्स येथील ग्रॅड बिसनेस ब्युटी कार्यक्रमात सिनेअभिनेत्री महेक चहल यांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले.
योगिनी परदेशी या शिंदखेडा तालुक्यातील वायपुर येथील निवृत्त मुख्याध्यापक रामदास घुरमल परदेशी व कमलबाई रामदास परदेशी यांच्या सुन आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पती योगराज रामदास परदेशी सह ब्युटी पार्लर च्या गृहिणी तसेच शिंदखेडा शहरवासीयांकडुन अभिनंदन केले जात आहे.