अनगर येथे अजित पवारांच्या उपस्थित भव्य कृतज्ञता व शेतकरी मेळावा सपंन्न
सोलापूर (वैजीनाथ धेडे) अनगर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थिती भव्य कृतज्ञता व शेतकरी मेळावा नुकताच संपन्न झाला.
अनगर(ता.मोहोळ) येथे अनगर नगरपंचायत स्थापनेनिमित्त कृतज्ञता व भव्य शेतकरी मेळावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आ राजन पाटील, जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम(काका)साठे, आ.बबनदादा शिंदे, आ. यशवंत(तात्या)माने, आ. निलेश लंके, आ. संजय मामा शिंदे, आ अमरसिंह पंडीत,आ राहुल पाटील, आ दीपक सांळुखे, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील सह लाखोंच्या संख्येने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, महिला व शेतकरी उपस्थित होते.