महाराष्ट्र
अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी सोने-चांदीत घसरण ; चेक करा नवे दर
मुंबई : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४८,३९० आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,३९० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,७९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,४७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,८७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,४७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,८७० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३५ रुपये आहे.