शिंदखेडा येथे आदिवासी वसतीगृहासमोर प्रवेश रद्द केला म्हणून विद्यार्थी कुटुंबासह आमरण उपोषणास सुरुवात
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील संत गुलाब महाराज अनुसूचित जमाती मुलांचे वसतीगृहासमोर विद्यार्थी अविनाश दिलीप कोळी व हितेश दिलीप कोळी यांचा प्रवेश नाकारला गेला म्हणून आजपासून आमरण उपोषणाला विद्यार्थी पालक आई सरलाबाई दिलीप कोळी समवेत बसले आहेत. याप्रसंगी शिंदखेडा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तालुका अध्यक्ष मिलिंद पाटोळे व वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नामदेव येळवे यांनी पाठिंबा दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा येथे संत गुलाब महाराज अनुसूचित जमाती मुलांचे वसतिगृह सुरू आहे. सदर वसतिगृहात एस.टी.विदयाथ्याना कोटयाप्रमाणे प्रवेश दिला जातो.असे असताना सन -2018-19 पर्यंत अविनाश दिलीप कोळी व हितेश दिलीप कोळी या विद्यार्थी ना अॅडमिशन दिले होते. पण गेल्या दोन वर्षापासून आदिवासी प्रकल्प विभागाच्या धुळे कार्यालया कडुन कोणत्याही प्रकारचे योग्य संविधानिक कारण न देत वसतिगृहाने प्रवेश नाकारला गेला आहे. म्हणुन पुढील शिक्षण घेण्यासाठी अन्याय केला जात आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विशेष म्हणजे त्या विद्यार्थी कडुन आॅनलाईन व ऑफनाईन फार्म देखील वसतिगृहाने भरून घेतले आहे. अशा गुणवत्ता धारक विद्यार्थी चे भविष्याशी खेळणाऱ्या प्रकल्प अधिकारी व संबंधित अधिकारी हे जबाबदार आहेत.म्हणुन त्यांच्या वर अॅट्रासिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच दोन वर्षांची डी बी टी व प्रवेश पुर्ववत करावा आणि न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाहीत हयावर ठाम आहोत. यापुर्वीच पुर्वसुचना म्हणून जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रकल्प अधिकारी, पोलीस निरीक्षक यासह संबंधिताना निवेदन दिले होते. याप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मिलिंद पाटोळे, सहसचिव पंकज मोहिते, शहराध्यक्ष राहुल महिराळे, मोहन पाटोळे, गणेश पाटोळे, शरद कोळी, रवींद्र गिरासे, निलेश पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष नामदेव येळवे, प्रवीण येळवे, आनंदा शिरसाठ, रोहन कोळी यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला. उपोषणाचा पहिला दिवस होता. एकही अधिकारी उपोषण स्थळी फिरकले नाहीत.