वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
भुसावळ (प्रमोद बावस्कर) पंचशील नगर येथील मदिना मशिद आवारात वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचशील नगर मधील बौध्द मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बौध्द बांधवांनी मुस्लिम बांधवांना फळे खाऊ घालून रोजाचा उपवास सोडवला.
याप्रसंगी बाजार पेठ पोलिस स्टेशनचे निरिक्षक राहुल गायकवाड व वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, माजी नगर सेवक शेख मुश्ताक, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदनाताई आराक, कामगार नेते राजुदादा डोंगरदिवे, आनंद सपकाळे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर, गौतम लोखंडे, शोएब बागवान, सैय्यद फारुख, अनिस शेख, आवेस पटेल, जावेद शेख, अजय दाभाडे, पंकज सपकाळे, गौतम हिवराळे आदी उपस्थित होते.