अमळनेर

पांझरा नदीवरील मुडी व मांडळ फड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी मिळाली प्रशासकीय मान्यता

आमदार अनिल पाटलांचे यशस्वी प्रयत्न, अमळनेर तालुक्यातील अनेक गावांना मिळणार दिलासा

अमळनेर : पांझरा नदीवरील मुडी व मांडळ फड बंधाऱ्याची दुरावस्था झाली असताना आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी या दोन्ही बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास राज्याच्या जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून अमळनेर तालुक्यातील पांझरा काठच्या असंख्य गावांना याचा फायदा होणार आहे.

एकाच वेळी दोन्ही गावांच्या फड बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार असल्याने हे अतिशय महत्वपूर्ण काम आमदारांनी मार्गी लावले आहे.यात मुडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 3,60,75,931 रुपये रकमेस मान्यता मिळाली असून मुडी फड बांधाऱ्यासाठी 1,0978257 एवढ्या रकमेस मान्यता मिळाली आहे, याबाबत जलसंपदा विभागाचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे.दरम्यान पांझरा नदीचा उगम शेदवड ता साक्री या ठिकाणा वरून असून पांझरा नदी पश्चिम ते पूर्व अशी वाहत जावून मुडावद , ता.शिंदखेडा, जि धुळे येथे तापी नदीस मिळते.पांझरा नदीची लांबी 138 कि. मी. असून त्यावर ठिकठिकाणी 30 फड पध्दतीचे बंधारे असून सिंचनाच्या सोयीच्या दृष्टीकोनातून 200 ते 500 वर्ष मागील कालखंडात बांधण्यात आलेले आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या लाभदायक क्षेत्रात त्याखालील फड पध्दतीच्या बंधा-याच्या सिंचनासाठी समावेश आहे.

मुडी आणि मांडळ हे फड बंधारे हा वरील 16 फड पध्दतीच्या बंधा-यामधील असून न्याहळोद गावाच्या खालच्या बाजूस धुळे शहरापासून २५ कि मी अंतरावर आहे. सद्यास्थितीत बंधा-याची स्थिती चांगली असून कालव्याच्या नदीकडील भिंती काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून कालव्यावरील बांधकाम व विमोचके यांची दुरूस्ती तसेच नव्याने बांधणी करणे क्रमप्राप्त आहे.त्यासाठीच दोन्ही बंधारे दुरूस्तीची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती.

असा आहे मुडी बंधारा

मुडी फड बंधा-याचे सिंचन क्षेत्र 167 हेक्टर असून मुख्य कालवा 9.40 कि. मी. लांबीचा असून त्यावरील वितरीका क्र. 1 ही 1.25 कि. मी. लांबीची असून वाढविस्तार वितरीका 1.8प कि. मी. लांबीची असून त्याव्दारे भाल्या नाल्याचे पांझरा नदी मधून पुर्नभरण करणे सह सिंचन क्षेत्र पुर्नस्थापित करणे प्रयोजन आहे. सदर बंधा-यामध्ये नदी एस्केप बांधकाम करणे, कालवा पक्ष भिंत बांधकाम करणे, नदी एस्केप बांधकाम करणे, रस्ता क्रॉसिंग बांधणे, मुख्य कालवा व वितरीका क्र. 1 चे विमोचक बांधकाम करणे, मुख्य कालवा व वितरीका क्र.2 चे विमोचक बांधकाम करणे मुख्य कालव्याचे लोखंडी फळयांचे क्रॉस,रेग्युलर व मायनर यांचे विमोचक बांधकाम करणे, मुख्य कालवा रस्ता क्रॉसिंग बांधकाम करणे इ.कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुडी फड बंधारा दुरूस्तीच्या अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत तीन कोटी साठ लक्ष पंचाहत्तर हजार नऊशे एकतीस एवढया खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

मांडळ बंधाऱ्याचे वैशिट्य

मांडळ बंधा-याची स्थिती चांगली असून कालव्याच्या नदीकडील भिंती काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून कालव्यावरील बांधकाम व विमोचके यांची दुरूस्ती तसेच नव्याने बांधणी करणे क्रमप्राप्त आहे. मांडळ फड बंधा-याचे सिंचन क्षेत्र 199 हेक्टर असून मुख्य कालवा 8.45 कि मी लांबीचा असून त्यावरील वितरीका क्र.1 ही 1.05 कि मी लांबीची असून वाढविस्तार वितरीका 0.88 कि मी लांबीची असून त्याव्दारे भाल्या नाल्याचे पांझरा नदी मधून पुर्नभरण करणे सह सिंचन क्षेत्र पुर्नस्थापित करणे प्रयोजन आहे. सदर बंधा-यामध्ये जुना एस्केप वरील नव्याने बांधणे, रस्ता क्रासिंग बांधणे. मोहर नाल्यावरील जलसेतूची दुरूस्ती करणे. मुख्य कालवा वितरीका क्र.1 वरील वितरण व्यवस्थेमधील बांधकामाची दुरूस्ती करणे. सी आर कम आऊटलेट बांधणे, मुख्य कालवा विमोचक व रस्ता क्रॉसिंग बांधणे. हेकंळवाडी रस्त्यावर वितरीका क्र.1 च्या मुखाशी रस्ता क्रॉसिंग बांधणे. वितरीका क्र.2 वर रस्ता क्रॉसिंग बांधणे. इ. कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.त्यामुळे मांडळ फड बंधारा दुरूस्तीच्या अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता .एक कोटी नऊ लक्ष अठयाहत्तर हजार दोनशे सत्तावन्न रुपये एवढया खर्चास मिळाली आहे.

सदर दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी दिल्याने आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना अजित पवार, जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांचे जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.तर पांझरा काठावरील शेतकरी बांधव व जनतेने आमदार अनिल पाटील यांचे सदर मंजुरीबद्दल विशेष आभार व्यक्त केले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे