शिंदखेडा येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिंदखेडा व शिक्षण विभाग, पंचायत समिती, शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पंचायत समिती शिंदखेडा येथे करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख गिरीश देसले, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, शिंदखेडा शहर प्रमुख संतोष देसले, नाना पहाडी, किशोर पाटील, आर.आर. पाटील, शिक्षक सेनेचे भरत पवार, गटविकास अधिकारी देविदास देवरे, शिक्षक सेना उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शरद पाटील, धीरज परदेशी, गटशिक्षणाधिकारी सी.के. पाटील तसेच शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



